Sunday, January 12, 2025

Latest Posts

मराठा समाज लोकसभेच्या रिंगणात : प्रत्येक गावातून दोन उमेदवार

| TOR News Network | Maratha Samaj Latest News : सकल मराठा समाजाची एक महत्वपूर्ण बैठक परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीत गावनिहाय दोन उमेदवार उतरवण्यात येणार आहे.जर मराठा समाज मैदानात उतरला तर त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरु झाली आहे. (Maratha Samaj to Contest Loksabha 2024)

परभणी जिल्ह्यातील मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election 2024) गावनिहाय दोन उमेदवार देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. हा निर्णय मानवत येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज हा आक्रमक झालाय.आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक वर्षापासून लढा उभारला आहे. हा लढा मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil Loksabha Election) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकच तीव्र झालाय.

 सरकारला धडा शिकवण्यासाठी मैदानात

सरकारने समाजाला न्याय देऊ, समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. परंतु त्याची पूर्तता केली नाही. यामुळे समाजाची दिशाभूल झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्यासाठी गावनिहाय किमान दोन उमेदवार देण्याचा निर्णय रविवारी परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणुकीत गावनिहाय कोण दोन उमेदवार असणारी याची चर्चा सुरु आहे.

Latest Posts

Don't Miss