Sunday, January 12, 2025

Latest Posts

मराठ्यांची ९०० एकरावर विराट सभा जरांगे पाटील म्हणाले..

| TOR News Network | Maratha Reservation News : राज्य सरकारने  मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. मात्र, हे आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे.अशात आता लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाज एकवटणार असून तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यामुळे आता या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. (Jarange Patil Maratha Sabha on 900 acres land)

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विराट सभा घेण्यासाठी आम्हाला ९०० एकर जागा मिळाली आहे. मात्र, आम्ही अजूनही पार्किंगसाठी जागा शोधतोय. लवकरच सभेचं ठिकाणी आम्ही सांगू, असं ते म्हणालेत.

विनाकारण मराठा समाजात द्वेष पसरवला

यासाठी जरांगेंनी संवाद यात्रा काढली असून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मराठा समाजात द्वेष पसरवला आहे, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन राज्य सरकारने कारस्थान रचलं असून हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

त्यानंतरच आम्ही सभेचं ठिकाण सांगू

“देवेंद्र फडणवीस ट्रॅप रचत असून आम्ही घेत असलेल्या संवाद बैठकावर देखील निर्बंध लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या विराट सभा कशा असतात, हे फडणवीसांना थोड्याच दिवसांत कळेल”, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. “आम्हाला सभेसाठी ९०० एकरची जागा मिळाली असून आता फक्त पार्किंगसाठी जागा मिळणे बाकी आहे. ती मिळाल्यानंतर आम्ही सभेचं ठिकाण सांगू”, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

Latest Posts

Don't Miss