Maratha Andolan Latest News: महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे सर्वपक्षीय आमदार , खासदार व नेते मंडळी चांगलीच अडचणीत सापडलेली आहे. (Due To Maratha Amdolan in Maharashtra Mla,Mp Caught in Trouble) आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेच्या विरोधात त्यांना बोलताही येत नाही आणि त्यांचे खुले समर्थनही करता येत नाही आहे.एवढेच काय तर आंदोलनाच्या समर्थनात त्यांची भूमिका मांडण्यासाठी त्यांना गावत देखील जाताना रोषला समोर जावे लागत आहे.अशात कुठे आहेत हे लोकप्रतिनीधी.
मराठ्यांच्या आरक्षाच्या मुद्द्यावरुन राज्यात सरु असलेल्या आंदोलनाने सरकारला चांगलेच घेरले आहे.मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.अन्न त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावताच राज्यात जाळपोळच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.तर सरकार बैठकांवर बैठका घेत असून निकाल लागायचं नाव नाही.केवळ आश्वासनाचे फतवे काढण्यात येत आहे.मात्र या आंदोलने राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतले आहे.दिवसेंदिवस आंदोलन पेटत असल्याने लोकप्रतिनीधी धास्तावले असून ते खुले आम बोलने टाळत आहे.हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील ,वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे अशा काही मोजक्या आमदारांनी यात बिनधास्त उडी घेत आपला राजीनामा दिला आहे.मात्र काही नेत्यांनी या आंदोलनावर टीका केल्याने त्यांची घरे कार्यालये जाळण्यात आली आल्याने त्यांनी देखील दोन पावले मागे घेतली आहे.ते यावर फारसे बोलण्यास टाळत आहे.तर अनेक गावांच्या प्रवेळ द्वारावर लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहे.तर आगदी उपमुख्यमंत्रीपासून ते आमदारांच्या गाड्या देखील अडवल्या जात आहे.अशात मंत्र्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.राज्यातील हे हिंसक चित्र बघता नेले मंडळींनी मुंबई,दिल्लीत राहणे पसंत करित आहेत.हे सर्व सुरु असताना मात्र नेत्यांना आपल्या मतदार क्षेत्रात फिरणे अवघड झाले आहे.
निवडणुकांवर होणार हा परिणाम
सध्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी नेते मंडळीसाठी गाव बंदीची घोषणा केली आहे.पुढे आता सर्वत्र निवडणुका होऊ घातल्या आहेत.अशात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेते मंडळींना अडचणी येत असून गावातील समस्या कायम आहेत.त्यामुळे याचा मोठा परिणाम आगामी निवडणूकांवर होण्याचे नाकारता येत नाही.काही गावातील मंडळींनी मतदानावरही बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.अशात लोकप्रतिनीधी चांगलेत धास्तावले आहेत. राजकिय पंडितांच्या मते याचा सर्वात मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता त्यांनी वर्तावली आहे.