Saturday, January 11, 2025

Latest Posts

Maratha Andolan: या आमदार पुत्राला फोन पे वरुन येत आहे एक, दोन रुपये

संभाषण झाले व्हायरल, त्यामुळे मराठा आंदोलक संतप्त

Maratha Andolan Latest News: मराठा आंदोलनाने आता राज्यात पेट घेतला आहे.मनोज जरांगे पाटील परत आपल्या मागण्या घेत आंदोलनावर बसले आहेत. मात्र या दरम्यान एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे.मराठा आंदोलकांनी आता एका आमदार पुत्राला चक्क फोन पे वरुन एक, दोन रुपये पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे.(Maratha Andolak Sending One,Two Rupees to Son Of Amdar) त्यामुळे आमदार पुत्र चांगलेच वैतागले आहेत.

सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलक (Maharashtra Maratha Andolak) आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ केल्या जात आहे.चक्क आमदारांचे घर पेटवण्यात आले आहे.माजलगावचे आमदार प्रकाळ सोळुंके यांच्या निवासस्थानासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय संतप्त आंदोलकांनी पेटवले आहे.रास्ता रोको,माहामार्गांवर टायर जाळो आंदोलन केल्या जात आहे.तर दुसरीकडे सरकार केवळ आश्वासन देत नवनवीन समित्या गठित करत वेळ काढत आहे.या आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याची चर्चा रंगत असताना एक नवं प्रकरण समोर आले आहे.एका आमदार पुत्राने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचा खर्च उचलल्याची ध्ननीफित व्हायरल झाली आहे.जरांगे पाटील यांनी राज्यभरात अनेक सभा घेतल्या.सभेला मराठा बांधवांनी उदंड असा प्रतिसाद दिला.अगदी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली होती.अशीच एक सभा सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघात झाली होता.या सभेसाठी अजित पवार गटाच्या आमदार पुत्राने आर्थिक मदत केल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.सोलापूरच्या माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सभेसाठी खर्च केल्याचे वक्तव्य त्या व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमध्ये केले आहे.त्यामुळे मराठा आंदोलक संतप्त झाले असून त्यांनी आता एक वेगळी मोहिम हाती घेतली असून त्याद्वारे आमदार पुत्र रणजितसिंग शिंदे यांचा निषेध करण्यासाठी पंढरपूरच्या मराठा आंदोलकांनी त्यांना फोन पे वर एक,दोन,पाच रुपये पाठवणे सुरु केले आहे.या सर्व प्रकारामुळे रणजितसिंग शिंदे मात्र कमालीचे हैराण झाले आहेत.   

संबधित बातमी: जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोणत्या आमदाराने दिला पाठिंबा

Latest Posts

Don't Miss