Monday, January 13, 2025

Latest Posts

अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट : अजित पवार गटाचे येवढे आमदार संपर्कात

| TOR News Network |

Anil Deshmukh Big Claim : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल बघता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे. काल राष्ट्ववादी अजित पवार गटाच्या आमदारांची तातडीची मुंबईत बैठक झाली.(Ajit Pawar mla Meeting) मात्र या बैठकीला नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ, धर्मराव बाबा अात्राम सुनील टिंगरे , अण्णा बनसोडे हे सहा जण अनुपस्थित होते.(Six Mla Absent in Ajit Pawar Meeting) हे सर्वजण गैरहजर का होते, याचे कारण कळवण्यात आले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Anil Deshmukh Big Claim On Ajit Pawar Group mla)

अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकसभा निकालानंतर शरद पवार, जयंत पाटील, माझ्या संपर्कात अनेक तरुण उमेदवार आहेत. दादा गटाचे अनेक आमदार संपर्कात आहेत, ते फोन करतात. (Ajit Pawar Group mla in Trouble situation) 15-20 दिवसांत काय होतं ते बघा. लोकसभेचा निकाल आल्यानंतर दादा गटाच्या अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असा दावा, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.(Anil Deshmukh Big Claim on Ncp Mla) विधानसभा लढवायची आहे. ते आपलं भविष्य बघतात. कोण्या पक्षासोबत फायदा यासाठी आमदारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

बारामतीचा निकाल अपेक्षित होता..

बारामतीत जो निकाल लागला तो आश्चर्यकारक नाही. पवार कुटुंबात फूट पाडून त्यांच्याच घरातील उमेदवार द्यायचा. आणि पवार साहेब यांना बारामतीत अडकवून ठेवण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणूकीतंही महाराष्ट्रात चमत्कार घडणार, असा विश्वास दावा त्यांनी केला. (Miracle will happen in maharashtra) या विधानसभ निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच येईल. विधानसभेसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.

Latest Posts

Don't Miss