Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजपच्या या तीन इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीचे संकेत

| TOR News Network |

Maharashtra Bjp Latest News : भाजपची पहिली यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. जे इच्छूक उमेदवार होते त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता होती. मात्र यादीत त्या नेत्यांचे नावे नसल्याने अनेकांनी बंडखोराचे संकेत दिले आहेत.(Bjp Leader hint to contest independent) यात राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम, (satyajeet kadam) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सुवर्णा पाचपुते (suvarna pachpute)तर बेलापूरमधून संदीप नाईक नाराज आहेत. (sandip naik) त्यांनी बंडाचे संकेत दिले आहेत.

राहुरी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत.(sandip naik expressed displeasure )

सत्यजित कदम यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. “मी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मी कार्यकर्त्यांमुळे नेता झालो, त्यामुळे त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार आहे. येत्या दोन दिवसात मी याबद्दलचा निर्णय घेईन”, असे सत्यजित कदम म्हणाले.

तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातही असेच काही चित्र आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.(Suvarna pachpute sad on bjp list)

‘मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी दिली. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे’ असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली.

सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवल खरं. मात्र भाजपचं पक्ष चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांचा कंठ दाटून आल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. तसंच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला.

नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये भाजपने गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र नाईक कुटुंब ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघातून इच्छुक होते. त्यामुळे भाजपची पहिली यादी झाल्यानंतर नवी मुंबईत संदीप नाईक बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. (sandip naik hint to contest independent)

संदीप नाईक बेलापूरमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संदीप नाईकांसाठी त्यांच्या मर्जीतले 20 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय. संदीप नाईकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज गटाची बैठक झाल्याची माहिती देखील आहे.

नाईक कुटुंब नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र भाजपने एका घरात दोन तिकीट देणे टाळत केवळ गणेश नाईक यांनाच उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज संदीप नाईक बंडखोरी करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Latest Posts

Don't Miss