Saturday, January 11, 2025

Latest Posts

मनोज जरांगेंची तब्येत प्रचंड खालावली ; संभाजीराजे उपोषणस्थळी

| TOR News Network |

Manoj jarange Patil Latest News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. हे उपोषण जालन्यातील अंतरवली सराटीत सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खूप खालावली आहे. (Jarange patil;s health goes down ) त्यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत.(Chhatrapati Sambhajiraje meet jarange patil) संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.( Chhatrapati Sambhajiraje warns maha govt)

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगेंवर ओबीसी नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना संभाजीराजे छत्रपती जालन्यात अंतरवली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी डॉक्टरांकडे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असून कोणत्याही आधाराशिवाय उठणे, बसणे त्यांना शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान डॉक्टर आंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी उपस्थीत असले तरी जरांगे यांनी कोणताही उपचार घेण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

मी पूर्वीही जरांगेंसोबत होतो. आजही आहे.उद्याही राहील. (I m with jarange patil says Chhatrapati Sambhajiraje) आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो. पण मला फोकस हलवायचा नाही. मी एक फोकस घेऊनच आलोय. तो म्हणजे मनोज जरांगे यांची तब्येत. तब्येत चांगली असेल तर सर्व गोष्टी करू शकतो. सरकारला सूचना आहे. मेडिकल रिपोर्ट घ्या. किडन्यांचं फंक्शनिंग काय आहे देव जाणे, लिवरचं फंक्शनिंग कसं आहे देव जाणे, ब्लड प्रेशर लो झालं आहे. याचं तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय?, असा सवाल संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे.

मराठा आरक्षणावर आज मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असून मराठा आरक्षणावर काय तोडगा  निघणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (ministers meeting on Maratha reservation in mumbai) मुंबईत सहृयाद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमितीची बैठक होणार आहे.

Latest Posts

Don't Miss