Sunday, January 12, 2025

Latest Posts

तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात? ते मी बघतो

जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा

| TOR News Network | Jarange Patil Media Breif Today : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे परत एकदा उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरेंची कायद्यात अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. आजपासून मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. (Rastaroko By Maratha Community) हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. तसेच आंदोलकांना दिलेल्या नोटीसीवरुनही त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. (Jarange Patil Warning To Maha Govt)

“सगे सोयऱ्यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. जाणूनबुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही. पूर्वी एक राजा न्याय द्यायचा. आता 3 राजे आहेत, तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत. फक्त आंदोलकांनी आंदोलन शांततेत करावे, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात? कशा नोटीसा देतात ते बघतो,” असे मनोज जरांगे म्हणाले.

काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील

“फक्त 11 ते 1 या वेळेत रास्तारोको करा. आज संध्याकाळपासून गावागावात धरणे आंदोलन करा. अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होईल. सगळे या, या बैठकीत महत्वाचा आणि अंतरिम निर्णय होईल, सरकार काय डाव आखतय ते मी लिहून ठेवलयं, उद्याच्या बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील. असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

नाही तर काही जण फाशी घेतील…

गुन्हे दाखल केल्यास मला सांगा

“सरकार आता रडीचा डाव खेळत आहे. मी बदल केला म्हणजे माघार घेतली नाही. आंदोलन कोणतंही केलं तरी मागणी तीच आहे. मी हरणार नाही. आंदोलकांनी नोटीसा स्विकारल्या तरी काही होणार नाही. रास्तारोको केला म्हणून गुन्हे दाखल केल्यास मला येऊन सांगा, गृहमंत्र्यांचे ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल,” असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Latest Posts

Don't Miss