Sunday, January 12, 2025

Latest Posts

लयं फडफड करत होता, आता  हिमालयात जाऊन झोपला की काय ?

| TOR News Network | Jarange Patil Latest News : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घणाघाती हल्ला केला आहे.(Jarange patil fired on Bhujbal) नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुण्यातील भोरमध्ये भुजबळ यांना घेरले. मनोज जरांगे म्हणले, ”लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?.(where is Bhujbal now a days) दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. (Manoj Jarange on Chhagan Bhujbal)

एकीकडे जरांगे पाटील ८ जून रोजी त्यांच्या होणाऱ्या सभेची जय्यत तयारी चालली आहे. ही सभा विश्वविक्रमी करण्यात येणार आहे. त्याचवेळी विरोधकांना घेरण्याची तयारी मनोज जरांगे करत आहेत. पुण्याच्या भोरमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली. त्यानंतर याचा आधार घेत येवल्यावरून आली का काय?. असे म्हणत त्यांनी हा निशाणा साधला. (Jarange slams bhujbal) पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. (But now our Community has become one) लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी यावेळी दाखवावी, हे मी मराठ्यांना सांगितले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

आता मराठा विधानसभेच्या रिंगणात

सगेसोयऱ्याची अंबलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करणे हे महत्वाचे आहे, जो या बाजूने असेलं त्याला समाजानं मतदान करावे. जर आरक्षण नाही दिलं, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज 100 टक्के मैदानात उतरणारं आहेस असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. (Maratha will contest vidhan sabha)

सहा कोटी मराठा येणार

मनोज जरांगे पाटील 8 जूनला होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, त्या ठिकाणी 1700 एकर जमीन आहे. त्यातली 900 एकर जमिनीची साफसफाई होत आहे. येत्या एक तारखेपासून त्याचे कामं अधिक वेगाने सुरू होणारं आहे. नारायणगडाच्या पायथ्याशी शेकडो गावांची जवळपास 2 हजार हेक्टर जमीन आहे, पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकरी त्याचे बांधसुद्धा मोडणार आहेत. राज्यातील 6 कोटी मराठा समाज त्याठिकाणी येणार आहे.(6 crore maratha will come at rally) गावागावात त्याची जागृती लोकांनी सुरू केलेली आहे. एकही मराठा त्यादिवशी घरी राहणार नाही.

Latest Posts

Don't Miss