Saturday, January 11, 2025

Latest Posts

आरक्षण द्या, डेडलाईन दोन दिवसांवर आली –  मनोज जरांगे

फेब्रुवारीची मर्यादा आम्हाला मान्य नाही

Manoj Jarange Patil Latest News Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी या घोषणेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुख्यमंत्र्यांची ही डेडलाईन आम्हाला मान्य नाही. (On Cm Eknath Shindes statement jarange patil replied saying dead line coming on next two days) 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं असे जरांगे पाटील म्हणाले.

पुढे जरांगे पाटील म्हणाले आम्ही शांततेत आंदोलन करू, पण आंदोलन होणारच. 24 डिसेंबरच्या आधी त्यांनी आरक्षण द्यावं. 2 दिवसांमध्ये काही नाही झालं तर पुढची दिशा ठरेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. परभणीतल्या सेलूमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले की, 1967 पासून ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते एक चांगलं झालं.कारण नातेवाईकांना आरक्षण देण्याचं जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही.मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडताना राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत देत, त्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला होता.आता 24 डिसेंबरला 2 दिवस उरले असल्यानं सगळ्यांच्या नजरा राज्य सरकार आणि मनोज जरांगे या दोघांच्याही भूमिकांकडे लागले आहे.

Latest Posts

Don't Miss