Saturday, January 18, 2025

Latest Posts

मराठा वादळ मुंबईला धडकणार म्हणजे धडकणारच

जरांगे पाटीलांनी ठणकावून सांगितली भूमिका

Jarange patil on Mumbai Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेण्यात आली. पण सगे सॊयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. त्यावर तोडगा निघण गरजेच आहे. यावर जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Maratha Reservation Protest in mumbai)

मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील हे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. (20 jan Maratha Reservation Protest in mumbai) येत्या 20 जानेवारीला ते जालना अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी जे मुद्दे मांडलेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मांडलेल्या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही समाधान झालेलं नाही.(Jarange Patil Protect News in Mumbai) सोयरे या शब्दावरुन सगळ अडलं आहे. “सोयरे संदर्भात आम्ही दोन महिने झाले, व्याख्या देतोय पण ते फक्त त्यामधील एक शब्द घेतात. व्याख्येसह सगे सोयरे शब्द घेतला पाहिजे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

“सर्व सग्या सोयऱ्यांना शब्द वापरून ज्याची नोंद सापडली त्या बांधवांचा आधार घेऊन, ज्याची नोंद सापडली नाही, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा ही व्याख्या घेणे आवश्यक आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाजाला आवाहन आहे, की मुंबईला जाताना रॅली मध्ये शांतपणे यावे आणि ज्यांना स्वयंसेवक व्हायचे आहे, त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीला यायचे आहे. 20 जानेवारी बद्दल कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. आरक्षण मिळाले, तरी मुंबई जाणार आहोत आणि नाही मिळाले तरी मुंबईला जाणार आहोत. (20 jan maratha protest in mumbai) आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही मिळाले तर आरक्षण आणायला जाऊ” असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

Latest Posts

Don't Miss