Thursday, January 16, 2025

Latest Posts

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे..पण…

मनोहर जोशी यांचं हे वक्तव्य कधीही विसरता न येणारं आहे

| TOR News Network | Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू मनोहर जोशी यांचे आज निधन झाले (86). (Former Cm Joshi Passed Away) एककाळ असा होता जेव्हा शिवसेना पक्षातील अनेक महत्त्वाच्यां निर्णयांमागे मनोहर जोशी यांचे विचार असायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जोशी यांनी राजकारणातील धडे गिरवले. (Manohar Joshi studied politics under the guidance of Balasaheb Thackeray) युती तुटल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती.(Uddhav And Raj Should Come Together)

ठाकरे बंधूबद्दल मनोहर जोशी यांचं मोठं वक्तव्य

पुण्यातील एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या सुरु असलेल्या चर्चांवर विचारण्यात आलं. तेव्हा मनोहर जोशी म्हणाले, ‘ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण फक्त कार्यकर्त्यांची इच्छा असणं महत्त्वाचं नाही. ठाकरे बंधूंची देखील इच्छा असणं तितकच महत्त्वाचं आहे…’(Thackeray Brothers should Come Together)

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा इतिहास घडेल

पुढे मनोहर जोशी म्हणाले होते, ‘दोघांनी एकत्र यावं यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची इच्छा आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा इतिहास घडेल. त्यासाठी दोघांनी इच्छा असणं महत्त्वाचं आहे…’ असं देखील मनोहर जोशी म्हणाले होते. मनोहर जोशी यांचं हे वक्तव्य कधीही विसरता न येणारं आहे.

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री

मनोहर जोशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवले. 1995 मध्ये महाराष्ट्राचे ते पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद,(Mumbai Mayor Manohar Joshi) राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदे भुषविली होती. (Loksabha Speaker Joshi) पण आज त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

Latest Posts

Don't Miss