Monday, January 13, 2025

Latest Posts

इंडिया आघाडीला झटका, ममता बॅनर्जी फुटल्या

Mamta Banerjee Latest Statement : काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघालाय. (Tmc out of india aghadi) तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे. ( Bengal cm Mamta Banerjee shocked India Aghadi )त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Tmc will fight alone in 2024 )बुधवारी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

काँग्रेसने TMC चा प्रस्ताव मानला नाही, म्हणून हा निर्णय घेतला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन वादविवाद सुरु होते. ज्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही, त्यावेळी TMC ने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत.

काँग्रेस पक्षासोबत माझ कुठलीही चर्चा झाली नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. “पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय. आमची एक धर्मनिरपेक्ष पार्टी आहे” असं त्या म्हणाल्या. “आम्ही स्वबळावर भाजपाला हरवू शकतो, मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण त्या बद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही” असं त्या म्हणाल्या.

Latest Posts

Don't Miss