Saturday, January 18, 2025

Latest Posts

मला देशात अराजकता माजवायची होती : Parliament Security Breach Accused

आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांची धक्कादायक माहिती

Parliament Security Breach Accused: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गदारोळ झाला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी मारून कॅनमधील पिवळा धूर सोडला. यामुळे काहीकाळ कामकाज ठप्प झालं होतं. तर, खासदारांनाही क्षणभर काय होतंय हे कळलं नाही. याप्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

या प्रकरणातील ललित झा याला काल (१५ डिसेंबर) पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. या कटाचा मीच मुख्य सुत्रधार असल्याचं ललित झा याने पोलिसांच्या चौकशीत मान्य केल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.

या घटनेमागील कथित सूत्रधार ललित झा आणि त्याच्या सहआरोपींना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी देशात अराजकता निर्माण करायची होती, (I have to create Anarchy in india)असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या रिमांड याचिकेत नमूद केले. हल्ल्यामागचा खरा हेतू, त्यांचे शत्रू देशांशी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली.

दरम्यान, “आम्ही संसदेच्या आत आणि संसद भवनाबाहेर गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी संसदेकडे जाण्याचा विचार करत आहोत. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या ललित झा याने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याने आपला फोन दिल्ली-जयपूर सीमेजवळ फेकून दिला आणि इतर आरोपींचे फोन नष्ट केले”, एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

Latest Posts

Don't Miss