Thursday, January 16, 2025

Latest Posts

मेळघाटात भीषण अपघात ; खासगी बस पुलावरुन कोसळली

| TOR News Network |

Amravati Bus Accident Latest News :  परतवाडा ते धारणी रोडवर भीषण अपघात होऊन 50 प्रवासी जखमी झाल्या असून चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे. (melghat Private Bus Accident) यात चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून (four passengers serious in melghat accident) जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथे उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात येत आहे.

अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावरच हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली आहे.(driver lost control on bus) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

पुलावरुन वळण घेत असताना चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 50 प्रवासी होते.(50 passenger injured) यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच, दरी खोल असल्याने या प्रवाशांना बाहेर काढणेही कठिण ठरतंय. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच. दरीत पाणी असल्याने बचावकार्य करण्यासही अडथळा येत आहे.

अपघातानंतर स्थानिक व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. स्थानिक रहिवाशांना जखमींना मदत करत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तसंच, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत अपघाताची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. अपघातस्थळी पोलिस अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित आहेत. (police on accident spot) दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाट परिसरातील वळण रस्त्यावर हा अपघात घडला आहे. येथील वळणे धोकादायक असून चालकाने वाहनं चालवताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसंच, प्रवाशांसाठी योग्य सूचना फलक आणि रस्त्याची देखभाल आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Latest Posts

Don't Miss