Thursday, January 16, 2025

Latest Posts

क्रिकेटपटू श्रीसंतवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

Police Complaint Against Cricketer S Sreesanth: भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत परत अडचणीत आला आहे. त्याने स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याच्या नावाखाली एका गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याचा त्याचावर आरोप आहे. त्यामुळे श्रीसंतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cricketer S Sreesanth Booked In Cheating Case) त्याच्यासह इतर दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

सुरेश गोपालन यांनी ही तक्रार केली होती. ते चुंडा येथील रहिवासी असून आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी २५ एप्रिल २०१९ पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचे सांगून विविध तारखांना १८.७० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. यामध्ये श्रीसंतही भागिदार आहे. सुरेश गोपालनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकादमीमध्ये भागीदार बनण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी पैसे गुंतवले. श्रीसंत आणि इतर दोघांवर आयपीसी कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीसंतचे नाव आहे.

सध्या श्रीसंत काय करतो?

श्रीसंत सध्या निवृत्त खेळाडूंच्या लीग LLC म्हणजेच लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवत आहे. बुधवारी (22 नोव्हेंबर) रात्री झालेल्या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून खेळताना त्याने भिलवाडा किंग्जविरुद्ध एक विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भिलवाडा किंग्जला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. पण पहिल्या चेंडूवर षटकार मारूनही श्रीसंतने जबरदस्त पुनरागमन केले आणि केवळ 10 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Latest Posts

Don't Miss