Saturday, January 18, 2025

Latest Posts

निलंबित तरीही Mahua Moitra पुढे आहेत ‘हे’ तीन पर्याय

Mahua Moitra Latest News : ‘कॅश-फॉर-क्वेरी’ प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या सदस्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. संसदेच्या नितीमत्ता विषयक समितीने दिलेल्या निर्णयावरून लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाजी मतदान घेऊन महुआ मोईत्रांच्या निलंबनावर शिक्का लावला.

महुआ मोईत्रांच्या निलंबनानंतर आता त्या काय करणार, कुठले पाऊल उचलणार? याकडे विशेष लक्ष आहे. राजकीय आणि विधी तज्ज्ञ यावर आपले तर्क लावत आहेत. खासदार व वरीष्ठ अधिवक्ता विवेक तनखा यांच्या मतानुसार, महुआ मोईत्रांकडे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय, महुआ निर्णयाचे समिक्षण करण्यासाठी संसदेला विनंती करू शकतात. मात्र त्यांच्या विनंतीवर पूनर्विचार करायचे अथवा नाही हे संसदेवर निर्भर आहे. दुसरा पर्याय, मुलभूत अधिकार आणि नैसर्गिक न्यायाच्या उल्लंघनाच्या सिमीत मुद्द्यांवरुन त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात. तिसरा आणि शेवटचा पर्याय, निर्णयाचा स्वीकार करून चार महिन्यानी पुन्हा निवडणूक लढावे. या तीन पर्यायांसोबतच आणखी दोन पर्याय महुआंपुढे आहेत. एक म्हणजे, महुआ मोईत्रा हे तर्क देऊ शकतात की, सदर प्रकरणात विशेषाधिकार समितीने लक्ष द्यायला हवे होते ना की आचार समितीने. दुसरा, मानहानी प्रकरणात त्या त्यांच्यावर लावलेले आरोप हे निंदनीय अथवा काल्पनिक आहेत हे जर त्या सिद्ध करू शकल्या तर त्या आचार समितीचा निर्णय फेटाळून लावू शकतात. मात्र या प्रकरणात आता महुआ मोईत्रा पुढचे पाऊल काय टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभेने तृणमूल काँग्रेसच्या सदस्या महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व निलंबित केले आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरुन नितीमत्ता विषयक समितीने दिलेला अहवाल सभागृहाने स्वीकारला. याप्रकरणी मोईत्रा दोषी असल्याचा अहवाल समितीने दिला होता. हा अहवाल स्वीकारण्याची शिफारस संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली होती. सर्व सदस्यांनी संसदेचा आणि लोकशाहीचा गौरव कायम राहील, अशी वर्तवणूक ठेवावी असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या अहवालावर चर्चेची परवानगी देताना सांगितले. या अहवालाचा अभ्यास करायला सदस्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. मोईत्रा यांनाही बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही असा दावा काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी चर्चेदरम्यान केला.

Latest Posts

Don't Miss