Team India Coach : नुकतेच झालेल्या विश्वचषका दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. अशात आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने माजी खेळाडूला प्रशिक्षकपदाची ऑफर दिली होती मात्र, त्याने ती नाकारली. म्हणून बीसीसीआयने आपला मोर्चा राहुल द्रविड कडे वळवला व त्याला विनंती केली आणि मग त्याने ती स्वीकारली.
सध्या भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका खेळत आहे, ज्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून संघासोबत आहेत. द्रविडनंतर लक्ष्मणची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ अशा बातम्या येत होत्या मात्र, द्रविडला मुदतवाढ मिळाल्याने ही शक्यता संपली आहे. मात्र, द्रविडच्या गैरहजेरीत तो अनेक वेळा संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करत राहणार असल्याचेही वृत्त आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पद रिक्त होते त्याजागी पुन्हा राहुल द्रविड याचीच निवड करण्यात आली आहे. विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपला होता, तो पुन्हा पुढे वाढवण्यात आला आहे. हा करार वाढवण्याआधी बीसीसीआयने गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहराला प्रशिक्षकपद स्वीकारण्याची विनंती केली होती. परंतु त्याने हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच आता बीसीसीआयने पुन्हा राहुल द्रविडला प्रशिक्षकपदी राहण्याची विनंती केली आणि त्याने ती मान्य केली. (Rahul Dravid Accepted the Offer Of BCCI As a Head Coach For Team India)पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदी राहावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. द्रविड यापूर्वी तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. पुढील वर्षी ४ जून रोजी अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. बीसीसीआयला नवीन मुख्य प्रशिक्षकाची लवकरात लवकर नियुक्ती करायची होती. प्रशिक्षक म्हणून पहिल्याच सत्रात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या आशिष नेहराला हा प्रस्ताव देण्यात आला होता. पुढच्या मोसमात संघाने त्याच्या प्रशिक्षणाखाली अंतिम फेरी गाठली होती. गुजरातचे खेळाडू, माजी क्रिकेटपटू, चाहते आदी सर्वांनी आशिष नेहराचे प्रशिक्षक म्हणून खूप कौतुक केले. मात्र, नेहराला सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारायची नाही.