Saturday, November 16, 2024

Latest Posts

महायुतीचे टेंशन वाढले : नाशिकच्या जागेसाठी अजितदादांची उडी

| TOR News Network | Nashik Lok Sabha Constituency : आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मात्र, असं असूनही महायुतीचा काही जागांवरील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.(Nashik seat trouble continues) नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार, याबाबत मतदारांमध्ये अद्यापही संभ्रम आहे.

नाशिक लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे (Nashik seat for eknath shinde shivsena) आहे. याठिकाणी हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत.(Hemant godse mp of nashik) मात्र, या जागेवरून भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यातच अजित पवार गटाने सुद्धा या जागेवर आपला दावा केला आहे.(Ajit pawar claim for nashik seat)

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा छगन भुजबळ (Chhagan bhujbal Willingness to contest elections from Nashik) यांनी बोलून दाखवली होती. मात्र, त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी माघार देखील घेतली. परंतु आता राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला आहे.(Nashik loksabha seat in trouble)

नाशिकच्या जागेसाठी गुरुवारी (ता. २५) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar took immediate meeting) नेत्यांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार गटाने महायुतीला नवा प्रस्ताव दिला आहे.(Ajit pawar new proposal to mahayuti Alliance) छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून अजित पवार गटाने महायुतीकडे दोन उमेदवारांची नावे सूचवली आहे.(Ajit Pawar suggest 2 new candidate for nashik seat)

माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा प्रस्ताव अजित पवार गटाने महायुतीला दिला आहे. नाशिकची जागा आम्हालाच मिळायला हवी, आमच्याकडे ताकतीचे उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.(we should get nashik seat)

अजित पवार गटाच्या या नव्या प्रस्तावामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. (Eknath shinde in tension) हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. दरम्यान, आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.(nomination form filling starts from today) त्यामुळे या जागेचा तिढा नेमका सुटणार तरी कधी? असा सवाल महायुतीचे कार्यकर्ते विचारत आहेत.(Question for candidate continues in nashik)

Latest Posts

Don't Miss