Saturday, January 11, 2025

Latest Posts

लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीचा प्लॅन बी कोणता

| TOR News Network | Mahayuti Formula For Loksabha : मुंबईत केंद्रीय गृहमंत्रा अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री शिंदे. फडणवीस आणि अजित पवारांसोबत 3 राऊंडची बैठक झाली.आता अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होईल.अशात महायुतीने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे.(Mahayuti plan B in mumbai) महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 फॉर्म्युल्याची माहिती हाती लागलीय. (Two Formula From Mahayuti for loksabha)

भाजप 37 जागा लढणार शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळतील. म्हणजेच 22 जागांची मागणी शिंदेंची शिवसेना करत असली तरी विद्यमान खासदारांऐवढ्याही जागा शिंदेंना मिळणार नाही. दुसरा फॉर्म्युला आहे. भाजप 36 जागा लढणार शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळणार म्हणजेच जागा वाटपात दबदबा भाजपचाच राहिल जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागांची मागणी अजित पवार गटाकडून अमित शाहांसमोर करण्यात आली. ज्यात प्रामुख्यानं 9 जागांचा प्रस्तावही शाहांसमोर ठेवण्यात आल्याचं कळतंय.

अमित शाहांचं बारकाईने लक्ष

भाजपनं जागा वाटपाचं सूत्र ठरवलेलं आहे. निवडून येऊ शकेल तीच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडायची. त्यासाठी भाजपनं 3-3 अंतर्गत सर्व्हे केलेत. त्याच आधारेच जागांचं वाटप होईल. अजित पवारांना 3 किंवा 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसं त्यांनी बंडानंतरच्या पहिल्याच मेळाव्यात जाहीरही केलं होतं. इकडे मुंबईच्या बाबतीतही अमित शाहांनी बारकाईनं लक्ष ठेवलंय…मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांकडून मुंबईतल्या 6 जागांचाही आढावा अमित शाहांनी घेतला.

लोकसभेसाठी महायुतीचा मेगाप्लॅन ठरला 

पण शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही

विशेष म्हणजेच भाजपनं मुंबईत भाजप 5 आणि शिंदे गटाला 1 जागेचा प्रस्ताव ठेवला पण शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही. तर भाजपनं एकनाथ शिंदेंना काखेत दाबू नये असं म्हणत सन्मानपूर्वक जागा शिंदे गटाला मिळाव्यात असं बच्चू कडू म्हणालेत.भाजपनं 195 जागांची पहिली यादी जाहीर केलेली आहे..आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर दुसरी यादीही जाहीर होईल. म्हणजेच पुढच्या काही तासांत महाराष्ट्रातला फॉर्म्युला समोर येईल.

Latest Posts

Don't Miss