Monday, November 18, 2024

Latest Posts

लोकसभेसाठी महायुतीचा मेगाप्लॅन ठरला

निवडणुकीसाठी रोड मॅप तयार

Mahayuti Press Conference Mumbai News : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच महायुतीच्या वतीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठीचा प्लॅन सांगितला आहे. भाजचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतच्या महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. (Mahayuti press conference for lok sabha election 2024 mumbai maharashtra )

राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी दिली.

तीन पक्ष एकत्रपणे निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मेळावे होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने रणशिंग फुंकण्यात आलंय. महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यासाठीच १४ जानेवारीपासून मेळावे सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये मेळावे संपण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिलीये.

Latest Posts

Don't Miss