Saturday, January 11, 2025

Latest Posts

वरळीतून आदित्य ठाकरे विरोधात उमेदवार निश्चित

| TOR News Network |

Aaditya Thackeray Latest News : राज्यात नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता सर्व राजकीय पक्षांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. (Vidhansabha Latest News) तसेच  बड्या नेत्याविरोधात चर्चेतील उमेदवार उतरवण्याची चाचपणी सुरु केली आहे.अशात शिवसेना उबाठामधील दिग्गज नेते आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने तयारी सुरु केली आहे.(Mahayuti Candidate vs aaditya Thackeray) आदित्य ठाकरे विरोधात वरळी विधानसभेतील उमेदवार ठरला आहे. (Worli Vidhansabha News)

लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीकडून पराभवाचे चिंतन होत असताना विधानसभेची रणनीती तयार केली जात आहे. (political party Strategy For Vidhansabha) लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुतीमधील राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.(mns To Contest Vidhansabha) मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे आव्हान देणार आहे. (Sandeep Deshpande Against Aditya Thackeray) राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.(Green Signal To Sandeep Deshpande From Worli)

मनसे नेते संदीप देशपांडे यांना ग्रीन सिग्नल मिळताच त्यांची तयारी सुरु आहे. मनसेकडून वरळी विधानसभेत ठीक ठिकाणी बॅनर लावून करण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. (Sandeep Deshpande Getting Ready For Vidhansabha)आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी मनसे निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच तयारीला लागली आहे. लोकसभेत एकत्र असलेली महायुती विधानसभेत एकत्र असण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीत २० जागांची मागणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mns On 20 Seats In Vidhansabha)

Latest Posts

Don't Miss