Thursday, January 16, 2025

Latest Posts

महायुतीत तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत,इतक्या जागांवर भाजप ठाम

| TOR News Network |

Mahayuti Seat Sharing Latest News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपा संदर्भात एकमत झाले आहे. (Mahayuti seat sharing almost final )भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामार्तेब झाल्याचं मानलं जात आहे.(Final Seat Sharing in mahayuti) मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींचं सत्र, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर अंतिम निर्णय झाल्याचं समजते.

महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपा स्वतः 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.(Bjp to contest 150-155 seats) तर भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एकूण 130 ते 135 जागा सोडण्यास तयार असल्याचं समजतं.(shinde sena and ncp ajit pawar to contest 130-135 seats) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (seat sharing meeting at sagar bunglow) भाजपासाठी डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांची जबाबदारी मोठया नेत्यांवर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मित्रपक्षांशी समन्वय, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि निवडणुकीच्या तयारीबाबत कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, दुसरीकडे आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. (amit shah 2 days in Maharashtra ) अमित शाह विदर्भात येणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाची संघटनात्मक बैठक घेणार आहे.(Amit shah meeting on vidharbha) लोकसभेत विदर्भातून कमी जागा मिळाल्या असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र तर काहींची कानउघडणी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आज सुरेश भट सभागृहात होणाऱ्या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची पक्षसंघटनात्मक बैठक होणार आहे. 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा आणि 2019 मध्ये घसरून 29 जगा जिंकल्या होत्या. सध्याची परिस्थिती पाहता यात घट न होता जागा वाढवण्यासाठी, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करत रणनीती आखली जाणार आहे. यात विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी- माजी आमदार यांसह प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. सुमारे 1500 पदाधिकारी या बैठकीत असणार अशी माहिती आहे. यासह काही प्रमुख पदाधिकारी यांचीही बैठक होईल अशी चर्चा आहे.

Latest Posts

Don't Miss