Thursday, January 16, 2025

Latest Posts

कोल्हापुरातून महायुती प्रचाराचा नारळ फोडणार : नागपूरात फडणवीसांचा रोड शो

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेते जाणार आहेत. (All Top Leader in kolhapur) यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कोल्हापुरात महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.(Uddhav Thackeray in kolhapur) तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड-शो होणार आहे. (Fadnavis Road show in Nagpur)

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत.(days 21 public meeting by fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रतही सभा होणार आहेत. 8 आणि 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण चार ठिकाणी सभा घेणार आहेत. (Pm Modi Public meeting in maharashtra) पंतप्रधान मोदींच्या 8 नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकात दोन सभा होणार आहेत. अकोला आणि नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबरला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन करण्यात आले आहे.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण – पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडणार आहेत. हिंगणा नाकापासून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो (प्रचार रॅली) असून दक्षिण – पश्चिम नागपूरच्या प्रमुख मार्गाने हा रोड शो जाणार आहे, या रोड शोच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करणार आहे.(Davendra fadnavis road show in south –west nagpur ) या रोड शोच्या माध्यमातून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस शक्ती प्रदर्शन करतील. आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला फडणवीस हजेरी लावणार आहेत. 

Latest Posts

Don't Miss