Saturday, January 18, 2025

Latest Posts

महाविकास आघाडीचा विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

| TOR News Network |

Mahavikas Aghadi Latest News : येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Vidhan sabha latest news) राज्यभरात सर्वच पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान महाविकास आघाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना विधानसभेत सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. (Congress to get More Seats in vidhan sabha) महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून काँग्रेस 100 ते 105 जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (congress to get more than 100 seats) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या, त्यातील 13 उमेदवार विजयी झाले आहेत. तर उबाठाला 9, शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे अधिक जागांचा दावा केला जाऊ शकतो अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, ठाकरे गट 90 ते 95 जागांवर (90 seats to uddhav Thackeray sena) आणि शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळतील (Sharad Pawar Ncp 85 seats) अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. (Maharashtra Vidhan Sabha) मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचे आघाडीतील एका नेत्याने सांगितले.

शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी मविआतील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक बैठक झाली. सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते.

Latest Posts

Don't Miss