Saturday, January 18, 2025

Latest Posts

महाविकास आघाडीच्या तीन बैठकांमध्ये १२५ जागांवर सहमती

| TOR News Network |

Mahavikas Aghadi Latest News :  विधानसभा निवडणुका बघता मविआच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मविआच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. या तीन बैठकांमध्ये १२५ जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.(Balasaheb Thorat on Mahavikas aghadi seat sharing) उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगरमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही. कारण राज्यातील जनतेने या सरकारला नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळणार आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. (Balasaheb Thorat claim to win more than 180 seats)

महायुती आणि आमची तुलना करू नका. महायुतीत जागा वाटपावरून मारामारी होत आहे. आमच्याकडे मैत्रीपूर्ण चर्चा होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. सर्वोच्चन न्यायालयाचे न्यायाधीश सी.जे.चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्यांनी गणपतीची आरती केली. त्यावर बोलताना थोरात यांनी देशातील न्यायाधीशांवरही दबाव असल्याच्या चर्चा सुरु असल्याचे म्हटले. (May be Pressure on CJI)

अजित पवार यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेला देखील त्यांची ही भूमिका आवडली नाही. त्यामुळेच निनावी कार्यकर्त्याने प्रातिनिधिक पत्र पाठवले असेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. एमआयएमने मविआमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपणास काहीच माहिती नाही.(Balasabhe Thorat on Mim) ही सर्व चर्चा उच्च पातळीवर झाली असल्याची थोरात यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss