Sunday, January 12, 2025

Latest Posts

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच

माजी मंत्री अनिल देशमुख यांचं मोठे भाकीत

Anil Deshmukh Latest Statement On Mahavikas Aaghadi : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करुन त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी आता नोटीस देवून कामावरुन कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो घाबरु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे.( Mahavikas aaghadi sarkar will come soon says former minister anil deshmukh) आघाडीचे सरकार येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात पहिलाच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

 या संदर्भात अनिल देशमुख यांनी एक व्टिट सुध्दा केले आहे. दि. ४ डिसेंबर २०२३ पासुन राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मासीक २६ हजार वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटी यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबरला नागपूर येथे मोठा मोर्चा सुध्दा काढला होता. त्याच दिवसी मी सुद्धा विधानभवनामध्ये त्यांच्या मागण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता या संदर्भात लवकरच संबधित विभागाशी बैठक घेण्यात येईल असे पत्रकही काढले. परंतु अद्यापही ती बैठक घेण्यात आली नाही. यानंतर २१ डिसेंबरला आयटकच्या वतीने अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी देवगीरी येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनीही तोडगा काढतो असे आश्वासन दिले. राज्यातील दोन मोठया नेत्यांनी आश्वासन दिल्याने यावर काही तरी मार्ग निघेल असे वाटत होते. तरी सुध्दा यावर काहीच कार्यवाही झाली नाही आणि संबधीत विभागाची बैठक झाली नसल्याची माहिती सुध्दा अनिल देशमुख यांनी दिली.

अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्याकडे वारंवार दुर्लक्ष तर केलेच उलट त्यांना नोटीस देवून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. यामुळे आजपासुन त्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या संघटना यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे अनिल देशमुख यांनी जाहीर केले.तसेच लवकरच आपले महाविकास आघाडीचे सरकार येणारच असून ते येताच सर्वात पहिले अंगणवाडीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले.

देशमुखांचे ते भाकीत ठरले होतं खरं

अनिल देशमुख यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत प्रचारा दरम्यान एक मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते भविष्यात राजकारणात काहीही घडू शकते. वेळ आली तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सरकार स्थापन करु शकते असे मोठं भाकीत केले होते. आणि पुढे कोणालाच वाटले नसेल असे घडले. निवडणूका होताच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवले होते.

Latest Posts

Don't Miss