Monday, January 13, 2025

Latest Posts

महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी शेवटचे तीन दिवस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढील भूमिकेकडे लागले लक्ष

Last 3 Days To Replace Shop Name Plates in Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात सर्व दुकानांसह आस्थापनांवरील पाट्या मराठी भाषेतून असाव्यात अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी मनसेतर्फे अनेक आंदोलनही करण्यात आले. आपली मागणी घेउन ते कोर्टात ही गेलेत.अशात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, असे निर्देश दिले आहेत. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता तीन दिवसांनी 26 नोव्हेंबर येत असून अजूनही राज्यातील अनेक दुकानदारांनी याची अमंलबजावणी केली नाही. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Supreme Court Decision for Marathi Nameplates On Shops In Maharashtra till 25 Nov 2023)

मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी नुकतेच  ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं, “आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता काहीच दिवस उरले आहेत. दोन भाषेत पाटी करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठीमधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे.” महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ असा कायद्याचा संदर्भही शिदोरे यांनी दिला. अनिल शिदोरे यांची पोस्ट रिपोस्ट करत मनसेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर म्हटलं की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात.त्यामुळे आता मराठीतून पाट्या लावण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहे.मात्र अजूनही राज्यातील अनेक दुकानांवरील पाट्या इंग्रजीतच दिसून येत आहे.त्यामुळे तीन दिवसांनी मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनसेने आपल्या अधिकृत एक्सवर एक पोस्ट टाकून याची आठवण करुन दिली आहे.

Latest Posts

Don't Miss