Saturday, January 18, 2025

Latest Posts

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी दिसावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय पूजा

Pandharpur Kartiki Ekadashi Pooja 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे पंढरपूरमध्ये सपत्निक विठ्ठलाची शासकीय पूजा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी दिसावा व सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद विठ्ठलाने आम्हाला द्यावी, असं साकडं घातलं. (DCM Devendra Fadnavis’ prayer at Pandharpur to Vitthala rukhmini 2023 Give us the strength to fulfill everyone’s wishes)

कार्तिकी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली. नाशिकचं घुगे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद विठ्ठलाने आम्हाला द्यावी, असं साकडं घातलं आहे.यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी.पुढे फडणवीस म्हणाले, आमची वारी ही आता आमची वारी राहिली नाही, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. त्यामुळे इथे व्यवस्था देखील तशीच असली पाहिजे. इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहत राहायला हवी यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. इंद्रायणीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे स्वच्छ करूनच त्यामध्ये गेले पाहिजे यासाठी प्रयत्न आपण सुरू केले आहेत. वेळ लागेल मात्र आपण सुरुवात केली आहे”.”महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. वारकरी कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या दिशेने चालत राहिले. त्यामुळेच कुठलाही कुकर्मा आमचा विचार संपवू शकला नाही. माणसं बदलली तरी श्रद्धा बदललेली नाही. विकास आराखडा आपण तयार केला आहे. आधी मंदिराचे संवर्धनाचे काम व्हावं यासाठी 75 कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज झाले आहे”. तसेच कोट्यवधी भाविकांच्या भावना यासोबत जोडलेल्या असल्याने हे काम उत्तम आणि लवकरात लवकर झालं व्हायला हवं अशा सूचना देखील फडणवीस यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.

Latest Posts

Don't Miss