Monday, November 18, 2024

Latest Posts

उद्या नागपूर जिल्ह्यातील सर्व बार बंद राहणार

करवाढी विरोधात सरकारचा नोंदवणार निषेध

नागपूर जिल्हा रेस्टॉरेंट परमिट रुम असोसिएशनचा निर्णय

Nagpur Bar Closed News 2023: राज्य शासनाने नोव्हेंबर महिन्यापासून बार व परमिटरुमवर वॅट टॅक्स ५ टक्क्यावरून १० टक्क्यावर केली आहे. ही करवाढ बार उद्योगासाठी घातक असून रेस्टारंट आणि परमिटरुम उद्योगाची कंबरमोड मोडणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाने करवाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी नागपूर जिल्हा रेस्टॉरेंट परमिट रुम असोसिएशने केली आहे. (Due To Increase in Vat Tax All Bar From Nagpur District will be Remain Closed ) यासाठी १६ नोव्हेंबरला असोसिएशनच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेस्टॉरेंट परमिट रुंम उद्योग मागील पाच वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परमिट रुमला हायवेवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देखील उद्योगाला मोठा तोटा झाला. आता राज्य शासनाने उद्योगावरील वॅट कर वाढवत १० टक्के केला आहे. महाराष्ट्रात १८ हजार परमिटरुम धारक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयामु‌ळे हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहील. याशिवाय वॅट वाढविल्याने राज्याच्या तिजोरीला देखील फायदा होणार नाही. राज्य शासनाने वॅट टॅक्स पूर्णपणे रद्द करून अवैध मालावर कारवाई केली तर शासनाला अधिक प्रमाणात महसूल प्राप्त होईल. करवाढीमुळे अवैध माल तयार होऊन त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाईल, अशी माहिती नागपूर जिल्हा रेस्टॉरेंट परमिट रुम असोसिएशचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत दिली. शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी असोसिएशनच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व बार १६ नोव्हेंबरला बंद ठेवण्यात येणार आहेत. असोसिएशनच्यावतीने १६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता संविधान चौकात निषेध सभा देखील घेतली जाईल. सभेनंतर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना असोसिएशनच्यावतीने निवेदन दिले जाईल. पत्रपरिषदेत असोसिएशनचे सचिव नवीन बावनकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss