Saturday, January 11, 2025

Latest Posts

महाराष्ट्रात बिअर होणार स्वस्त

शिंदे फडणवीस सरकारचे कोणते आहे नवे मद्य धोरण

राज्यातील मद्यपींसाठी एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. महाराष्ट्रात बिअरचे दर कमी होणार आहेत. (Beer rates will go down soon in Maharashtra) त्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने नवे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे.बिअरचे दर का कमी केल्या जात आहेत आणि काय आहे सरकारचे नवे मद्य धोरण.

एकीकडे राज्यात महगाई तोंड वर काढत आहे.सर्व जीवनावश्यक वस्तूंची दरे वाढतच आहे.महागाईमुळे सर्वसामान्यांना अधिकचा भार सहन करावा लागत आहे.अशात मात्र राज्यात बिअरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Sarkar) यंदाच्या आर्थिक वर्षीत जवळपास २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल वाढीचे ध्येय ठेवले आहे.हे ध्येय पूर्ण करण्याकरिता राज्य सरकारने मद्याच्या धोरणात बदल करण्याचे ठरवल्याची माहिती आहे.हे बदल केल्यास सरकारच्या महसूलात जवळपास ४०० कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. 

विशेष अभ्यास गटाची स्थापना

राज्य सरकारने नव्या मद्याच्या धोरणासाठी अभ्यासगटाची स्थारना केली आहे.या अभ्यास गटातील सदस्यांनी इतर राज्याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.देशी विदेशी मद्याच्या तुलनेत बिअर मध्ये मद्यार्काचे प्रमाण जास्त असते. मद्यार्क प्रमाणाच्या आधारे तुलना केल्यास बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर अन्य मद्यांपेक्षा जास्त असल्याने बिअर अनावश्यक महागली आहे अशी माहिती अभ्यस गटाच्या लक्षात आली आहे.हा अभ्यासगट या संदर्भात प्रस्ताव तयार करुन सुधारित बिअरचे दर ठरवणार असल्याची माहिती आहे. राज्य उत्पादन शुल्काचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या अभ्सागटात राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त,विभाग उपसचिव,अप्पर आयुक्त आदी आघिकाऱ्यांचा समावेश आहे.  

Latest Posts

Don't Miss