Saturday, January 11, 2025

Latest Posts

महाविकास आघाडी म्हणजे विविध पक्षांची खिचडी – फडणवीस

| TOR News Network | Devendra Fadnavis on Rahul Gandhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवारांच्या प्रचारात महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.त्यांनी राजापूर येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली.(Fadnavis slams Rahul Gandhi)  विरोधी गटात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांची खिचडी आहे, (Khichdi of various parties under the leadership of Rahul Gandhi)असा टोला मारत नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींना साथ द्या असे आवाहन केले. (Support Modi by electing Narayan Rane)

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे निश्‍चितच कोकणचा विकास साधतील. नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत.(A vote for Narayan Rane is vote for Narendra Modi) त्यामुळे नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींना साथ द्या. (Fadnavis says vote for narayan rane)आताची लोकसभेची निवडणूक ही भारताचे सक्षम नेतृत्व निवडण्याची आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक रिंगणात आहे असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘निश्‍चितच अबकी बार चारसो पार’ होणार आहेत. (Abaki bar charso par’ is going to happen) त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून खासदार म्हणून कोकणचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणचा विकास साधण्यासाठी राणे यांच्या माध्यमातून महायुतीला साऱ्यांनी साथ द्या. (For developmet of kokan elect rane) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली इंजिनाला विविध पक्षांचे डबे जोडलेले आहे. त्या डब्यांमध्ये समाजातील सर्वस्तरातील लोक बसलेले असून सबका साथ सबका विकास करीत ही गाडी पुढे जात आहे. या गाडीमध्ये सर्वसामान्यांना बसण्यासाठी जागा आहे. (Sab ka saath sab ka vikas) मात्र, पलीकडील गाडीला डबे नसून सर्वच इंजिन, सर्वसामान्यांना बसण्यासाठी जागा नाही.’’

फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था बळकट होत भारताचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्याद्वारे भारताने जगामध्ये मानसन्मान प्राप्त करीत जगामध्ये महासत्ता होण्याच्यादृष्टीने सक्षमपणे वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य, शेतकरी, महिला, उद्योजक यांसह समाजातील विविध घटकांचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधला गेला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.’’

Latest Posts

Don't Miss