Saturday, January 11, 2025

Latest Posts

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा आणि टप्पे जाहिर , महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान

| TOR News Network | Lok Sabha Election Dates 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे. एकूण ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.(Loksabha Election in Maharashtra in first phase)

लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होईल.

१.८२ कोटी नवीन मतदार

देशात २ लाखाहून अधिक मतदार १०० वर्षाचे आहेत. देशात १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. देशात ४७ कोटी महिला तर ४९ कोटी पुरुष मतदार आहेत. २ वेळा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार. पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही.

सात टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Latest Posts

Don't Miss