Sunday, January 12, 2025

Latest Posts

केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना परत डावलले

नारायण राणेंना राज्यसभेसाठी परत संधी नाही

| TOR News Network | Bjp Rajya Sabha Candidate List : भारतीय जनता पार्टीने बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यात पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार अशी दाट शक्यता होती. तसेच सरकारमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंना पुन्हा संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपने परत एकदा वेगळे उमेदवार दिल्याने पंकजा मुंडे यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली. (Bjp Candidate for Rajya Sabha)

भाडपाकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील तीन नेत्यांची उमेदवारीसाठी वर्णी लागलीय. मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण,अजित गोपछडे यांभारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. (Medha Kulkarni, Ashok chavan, Ajit gopchhade) महाराष्ट्रातील तीन नेत्यांची उमेदवारीसाठी वर्णी लागलीय. मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण,अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलीय.ना उमेदवारी देण्यात आलीय.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस १५ फेब्रुवारी आहे. तर अर्जांची पडताळणी १६ फेब्रुवारी रोजी पार पडेल. तसेच उमेदवारांना २० फेब्रुवारीपर्यंत आपला उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. मिळालेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राज्यसभेसाठी मतदान होऊ शकते. त्याचदिवशी सांयकाळी पाच वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

अबकी बार 400 पार मात्र सर्वे मध्ये भाजपला धक्का 

सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये उमेदवार मिळाला?

सरकारमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंना पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये. यामुळे नारायण राणे आता लोकसभेची तयारी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.(No Rajya sabha for narayan rane)

पक्षात येताच उमेदवारी

काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल भाजपा मध्ये प्रवेश केला.ते येताच दुसऱ्या दिवशी भाजपाने राज्यसभेसाठी यादी जाहिर केली आणि त्यात अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजीचे सुर दिसू लागले आहेत. त्या शिवाय पंकाजा मुंडे यांना देखील भाजपकडून वेळो वेळी गाजर दाखवल्या जात असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Latest Posts

Don't Miss