Sunday, January 12, 2025

Latest Posts

महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे

Theonlinereporter.com – May 13, 2024 

Sanjay Raut Latest News: आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पैसे वाटपाचा आरोप थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत.(Cm Shinde on Nashik tour) शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केलाय. त्यात त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हातात जड अशा काळ्या बॅग दिसत आहेत.(Bags in Eknath Shinde helicopter)

संजय राऊत यांनी X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओला ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!’ असं कॅप्शन दिलय. ‘नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय’ (Money Rain in Lok Sabha election)असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल पोलीस आहेत. त्यांच्या हातामध्ये काही बॅग दिसतायत.(Bag in shinde helicopter) त्यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ‘दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला?’ अस सवाल त्यांनी केलाय. (What is in bag with shinde)

“निवडणूक आयोग फालतु नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे” (Sanjay raut objection on bag with shinde)असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे मैदानात आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. काल पुण्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पैसे वाटपाचा आरोप केला होता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर ते ठिय्या आंदोलनाला बसले होते.

Latest Posts

Don't Miss