Sunday, January 12, 2025

Latest Posts

टीम इंडियीच्या विजय रॅलीत लाठीमार : अनेक चाहते जखमी

| TOR News Network |

Team India Victory Parade : बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या टी २० च्या अंतिम सामन्यात भारताने विजय नोंदवून तब्बल १७ वर्षांनी वर्ल्डकप उंचवला. त्याचा देशभरात एकच जल्लोष झाला.अशात भारतीय संघातील खेळाडूंचे काल भारतात आगमन झाले आणि त्यांच्या स्वागतसाठी लाखो मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली.(Marine Drive Team India Victory Rally) गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना कोही ठिकाणी लाठीमार करावा लागला.(Lathi charge in Team India Vijay Rally) यात काही जखमी झालेत तर काही क्रिकेट प्रेमींचा श्वास गुदमरला. (Cricket Lover Injured at Victory Parade) अशात पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेले.

टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत टीम इंडियाची विजय रॅली निघाली. भारतीय संघातील खेळाडूंसाठी एक खास बस तयार करण्यात आली आहे. या विजयी रॅलीस पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.(Team India Vijay Rally) या गर्दीवर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड झाले. यामुळे लाठीमार करावा लागला. अनेक चाहते स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी झाली होती.(Lakhs people rush to marine drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. वानखेडे स्टेडियमवरही चाहत्यांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने फिरत आहेत.(Marine Drive Rush Video)

मात्र मरीन ड्राईव्हवरील रॅलीला, या आनंदाला गालबोच लागले.कारण तेथील तूफान गर्दीमुळे अनेकांना त्रास झाला, बऱ्याच जणांचा श्वास कोंडले, गुदमरू लागल्याने त्यांची तब्येतही बिघडली होतीअनेकांच्या हातापायाला दुखापत झाली. जखमींपैकी काहींना व्हीटी येथील जीटी रुग्णालयात नेण्यात आलं.

याच दरम्यान मरीन ड्राइव्ह येथील दुकानातील एक व्हिडीओ समोर आला आहे. तेथील गर्दीमुळे काहींना गुदमरल्यासारखे वाटू लागले, तर काही जण बेशुद्धही झाले. त्यांना गर्दीतून बाहेर काढून उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.(Marine Drive Video goes viral)

तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दीमुळे एक तरूणी बेशुद्ध झाली होती.(Lady Unconscious At Marine Drive) तेथील एका पोलिस कर्मचाऱ्याने त्या गर्दीतून तिला कसंबसं बाहेर काढलं, तिला सरळ खांद्यावर टाकलं आणि गर्दीतून वाट काढत तो तिला उपचारांसाठी घेऊन गेला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Latest Posts

Don't Miss