Saturday, January 11, 2025

Latest Posts

वर्षावर मध्यरात्री बैठक; महायुतीमध्ये ४१ मतदारसंघात वाद

| TOR News Network |

Mahayuti Latest News : येणाऱ्या विधानसभेची निवडणूक बघता सर्वच पक्षात आता उमेदवारीबाब प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे. महायुतीमध्ये जवळपास ४१ मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.(41 Seat in Trouble for mahayuti) या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत.(Amit Shah on controversy seats) याच आठवड्यात राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन वादातीत मतदारसंघाबाबतचा निर्णय सामोचाराने सोडवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली आहे.(Late night Meeting on Varsha) राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकित सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तरचर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.(Uday Samant to Media) यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतत्वाखाली आखण्यात आलेल्या योजना लोकापर्यंत पोहोचवण्याबाबत आज चर्चा झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री स्वत: बहिणींची भेट घेऊन माहिती घेत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे सामंत म्हणाले. आम्ही योजना काढली तेव्हा काहीजण कोर्टात गेले होते असंही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss