Thursday, January 16, 2025

Latest Posts

लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीसाठीचा जुमला

| TOR News Network |

Supriya Sule On Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी या योजनेबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.(Supriya Sule Slams Mahayuti) ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे.(Ladki Bahin yojana is Election jumla) आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत.(Many Conditions in ladki bahin yojana) या योजनेमध्ये भष्ट्राचार होऊ नये, ही अपेक्षा आहे.

सुप्रिया सुळे यांनी शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत असे वक्तव्य करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.(Supriya Sule On Shivrajsingh chavhan) त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे डेटा होता म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चांगली राबवली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावर मत व्यक्त केले. (Supriya Sule On Onion crises) त्या म्हणाल्या, आम्ही पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांना कांदा, साखर यासंदर्भात सांगितले. शेतकरी अडचणीत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी पॉलिसी करताना जुमलेबाजी करु नका. कांदा निर्यात बंदी केली त्याचा परिणाम दिसून आला. आधीचे मोदी सरकार आणि आताचे एनडीए सरकार लोकांनी नाकारले आहे. 118 कोटीचा घोटाळा कृषी खात्यात झाला आहे, हे मी नाही बोलत आहे, हा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सुरक्षा संघाने केला आहे.(118 cr Scam in Agriculture Dept) सरकारने चुकीची कृषी धोरण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योजकांचे कर्जमाफी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. (Supriya sule on ajit pawar video) त्या म्हणाल्या, अजित पवारांवर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे पहिल्या दिवसांपासून दिसत आहे.

संभाजी भिडे यांनी साड्या न घालणाऱ्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करु नये, असे वक्तव्य केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांच्यावर कठोर टीका केली आहे.(Supriya Sule On Sambhaji Bhide) त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला जात आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या लोकांकडून हे केला जात आहे, हे दुर्दैव आहे.

Latest Posts

Don't Miss