Sunday, January 12, 2025

Latest Posts

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोणत्या आमदाराने दिला पाठिंबा

मराठा आंदोलनाने राज्यात रान पेटवले आहे.राज्यातील लाखो मराठा बांधवांनी याला पाठींबा दिला आहे.आता पर्यंत झालेल्या जरांगे पाटील (Which Mla Support Jarange Patils protest) यांच्या सभेला लांखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पहायला मिळाली आहे.मात्र आता या आंदोलनाला एका आमदाराने आपला पाठिंबा दिला आहे.कोण आहे तो आमदार….

मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध जिल्यांमध्ये उपोषण सुरू आहे.सरकार आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मराठा बांधवांची मागणी आहे.जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथून जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती.त्याची धग संपूर्ण राज्यात पसरली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आंतरवली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला  भेट दिली होती.यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुद्दत दिली होती.मात्र असे असतानाही अजून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे.आरत्क्षणाच्या मागे राजकीय शक्ती आहे आशी चर्चा देखील होऊ लागली आहे.जालना जिल्ह्यात बांधव पारनेर येथील तहसील कार्यालयापुढे मराठा बांधव आंदोलनाला बसले  आहेत. याच आंदोलनाला आमदार निलेश लंके यांनी आपला पाठिंबा जाहिर केला आहे.लंके यांनी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना तसेच तहसीलदारांना पत्र देत आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले आहे.लंके म्हणाले खरं तर जिल्ह्यातील बांधव पारनेर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला मला भेट द्याची होता,मात्र कामा निमित्त मुंबईत असल्याने भेट देता आली नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.मराठा बांधवांच्या आंदोलनाच्या आंदोलनातून करण्यात आलेली मागणी रास्त असून सरकारने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी असेही लंके यांनी निवेदनातून म्हणटले आहे.लंके हे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत.त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राजकीच वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे लंके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत.त्यांनी करोनाच्या काळात केलेल्या कामांची प्रशंशा पवार यांनी केली होती. 

Latest Posts

Don't Miss