Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजप खासदाराने लावली पाच कोटी रुपयांची शर्यत

kolhapur lok sabha news : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक निवडणूक रिंगणात उतरतले आहे. त्यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. (Sanjay mandlik vs shahu maharaj chhatrapati) यामुळे ही निवडणूक रंगत आणणार आहे. या मतदार संघातून संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडणून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आता त्यासाठी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी 5 कोटी रुपयांची अनोखी शर्यत लावली आहे. मतदार संघातील प्रचार सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे.(5 crore race declared in kolhapur loksabha)

काय म्हणाले धनंजय महाडिक

धनंजय महाडिक म्हणाले, मतदार संघात आपली चांगली परिस्थिती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील आपल्यासोबत आहेत. भाजपची मोठी ताकद तालुक्यात आहे. तुम्ही सर्वांनी ठरवले तर काँग्रेसचे बुथ लागणार की नाही, याची मला शंका आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आहेत, मंडलिक आहेत. आता चंदगड तालुक्यात चांगली परिस्थिती आहे. यामुळे संजय मंडलिक यांना जास्त मताधिक्य देण्यासाठी या दोन तालुक्यात स्पर्धा लागली आहे. यामुळे धनंजय महाडिक बोलताना म्हणाले की, मी तुम्हाला आव्हान करतो, कागल तालुक्यापेक्षा तुम्ही जास्त लीड दिले तर पाच कोटी रुपयांचा अधिक निधी देईल.(An additional fund of Rs.5 crore will be provided) आता शर्यत लागली…लावू या शर्यत…यामध्ये आम्ही दोघे आहोत, नाहीतर तुम्ही मला एकट्याला धराल.

खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात स्पर्धा लावली गेली. लीड देणाऱ्या तालुक्याला देणार 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मिळणार आहे. संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची शर्यत चंदगड येथील एका प्रचार सभेत लावली आहे. या प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.(video of the announcement in the campaign meeting went viral)

महाविकास आघाडीकडून टीका

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले होते. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने संजय मंडलिक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना संजय मंडलिक म्हणाले, मी बोलताना एक शब्द चुकलो. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाही, असे मला म्हणायचं होते. आता शाहू महाराज यांनी दत्तक विधान झाले आहे की नाही हे त्यांनी सांगावं? दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं? त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ( I did not insult Shahu Maharaj)

Latest Posts

Don't Miss