Sunday, January 12, 2025

Latest Posts

अजित पवारांनी कोल्हापूरात उमेदवार जाहीर करताच फडणवीसांना धक्क : भाजपचा बडा नेता तुतारी हातात घेणार

| TOR News Network |

Kolhapur BJP Latest News : आगामी विधानसभेच्या निवडणुका बघता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विशेष करुन पक्ष बदलाचे वारे सध्या जोरात वाहत आहे. कोल्हापुरत देखील याचे पडसाद बघायला मिळात आहे. कोल्हापूरात भाजपचे नेते समरजीतसिंह घाडगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.(Samarjit Ghadge to left BJP) येत्या 23 ऑगस्टला ते शरद पवार यांची तुतारी हातात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.( Samarjit ghadge to Join Sharad Pawar NCP) विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी नुकतेच कोल्हापूरातून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे समरजीत घाडगे नाराज झाले असून ते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे.

 गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाडगे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या.  त्यानंतर त्यांनी  शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या.( Samarjit Ghadge Meet Sharad PAwar )  त्यानंतर त्यानंतर ते अखेर २३ ऑगस्टला समरजीत घाडगे कागलमध्ये  मेळाव्यात आपली भूमिका जाहीर कऱणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

समरजीत घाडगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. (Samarjit ghadge Close To DCM FAdnavis) तर हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणूनही त्यांची ओळख होती. पण अजित पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हेदेखील सत्तेत समील झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी अनेकदा आपली नाराजीही बोलून दाखवली.  फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपमध्येच थांबण्याचा निर्णयही घेतला. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या उमेदवारालच कागमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्या. अजित पवार यांनीदेखील कागदमध्य झालेल्या मेळाव्यात हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली.  त्यामुळे समरजीत घाडगेंची अस्वस्थताही वाढू लागली होती.

दरम्यान, राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुका, त्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या घडामोडी आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.  जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही या बदलत्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत.त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार नेतेमंडळींही देखील रणनीती  आखताना दिसत आहेत..

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून समरजीत सिंह घाटगे यांना  उमेदवारीसाठी ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच अजित पवारांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने समरजीत घाटगे यांच्याही राजकीय भविष्याचा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे त्यांच्याकडेही  तुतारी हातात घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. याचे कारण म्हणजे कागलच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास दरवेळी त्याचा फायदा हा हसन मुश्रीफांना होतो. त्यामुळे समरजीत घाडगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Latest Posts

Don't Miss