Monday, January 13, 2025

Latest Posts

रामटेक मधुन किशोर गजभियेमुळे काँग्रेसला फटका..गजभिये म्हणाले..हो

| TOR News Network | Kishor Gajbhiye Ramtek :  माजी काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनी रामटेक लोकसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार अर्ज भरला.अशातच रामटेकमधून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यानंतर वंचितने किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. (Vanchit Declared support to Kishor Gajbhiye) त्यामुळे आता रामटेकचे गणित बदलले आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Kishor gajbhiye reaction)

अपक्ष उमेदवार किशोर गजभिये म्हणाले की, ‘मला मागच्या निवडणुकीत चार लाख 70 हजार मते मिळाली. तो एक बेस आहे. अर्थातच ते काँग्रेस पक्षात राहून मला मिळाले होते. काँग्रेस पक्षातील ज्या लोकांना माझा स्वभाव, माझं शिक्षण आवडतं. ते लोक मला मतदान करतील. दुसरीकडे वंचित बहुजनांचा जो व्यापक वर्ग आहे, तो देखील मला मतदान करेल’.

वंचितच्या पाठिंबव्यावर गजभिये पुढे म्हणाले, ‘ वंचितने मला दिलेल्या पाठिंब्याचा फार मोठा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. (Vanchit support will impact) बाळासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक कार्यकर्त्यांचा रामटेकमध्ये फायदा होईल या दृष्टीकोनातून हा पाठिंबा दिला आहे. (Prakash ambedkar support in ramtek) त्याकरीता त्यांचे आभार. मी काल दौऱ्यावर असल्याने या घटनेची माहिती मला उशिरा मिळाली. त्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या पाठिंबामुळे दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. माझ्या उमेदवारीत जी कमी होती ती या पाठिंबामुळे दूर झाली’. (Ramtek Lok Sabha )

‘मला आंबेडकरवादी बौद्ध समाजाचे मत मिळतील. मात्र वंचित बहुजन आघाडी ज्या समाज घटकसाठी काम करते, त्या वंचित दुर्लक्षित घटक त्यांच्यासाठी कोणीही काम केले नाही, अशासाठी वंचित काम करत असते. या पाठिंब्यामुळे या सर्व घटकाची मते मला मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तुमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला फटका बसणार का, या प्रश्नावर गजभिये म्हणाले, ‘ ती शक्यता आहेच, मात्र केवळ काँग्रेस पक्षालाच फटका बसेल असं काही होणार नाही.(My Setback to Congress And to others also) एका राजकीय पक्षाच्या पाठिंबामुळे माझी उमेदवारी अधिक भक्कम झाली आहे. खरंतर कधीच कोणत्याही उमेदवाराला एका समाजाचे मत शंभर टक्के पडत नाही. काही मतदार आपल्याला मतदान करणार देखील नाही, ते गृहीत धरूनच आपल्याला काम करावे लागेल’.

Latest Posts

Don't Miss