Thursday, January 16, 2025

Latest Posts

Kerala Bomb Blast: केरळ बॉम्ब स्फोटातील मृतांच्या संख्येत झाली वाढ

Kerala Bomb Blast Latest Update: केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी रविवारी लागोपाठ तीन भीषण स्फोट झाले.यात पहिले एका महिलेच्या मृत्यू झाल्याची नोंद होती.परंतु घटनेत मृत पावलेल्यांच्या संख्येत आता (Kerala Blast: Number of Death Increased in Blast) वाढ झाली आहे.सोमवारी यातील जखमी रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे ज्याने स्फोट घडवला त्याने आत्मसमर्पण केले आहे.

या भीषण घटनेनंतर केरळ राज्यात संपूर्ण अलर्ट जारी केला आहे.जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी या घटनेवर नजर ठेवून आहेत.येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ज्या आरोपीने आत्मसमर्पण केले त्याची चौकशी सुरु आहे.का हा स्फोट घडवला? त्या मागची कारणे शेधण्यात येत आहेत. आत्मसमर्पण केलेल्या आरोपीशिवाय अजून कोण किंवा कोणती दहशदवादी संघटना या मागे आहे काय याचाही शोध घेतल्या जात आहे.या घटनेमुळे अधिक दंगल घडू नये याकरिता पोलिस समाज माध्मांवरही बारिक लक्ष ठेवून आहे.समाजात तेड निर्माण होईल आशा पोस्ट टाकल्यास त्यावर कडक कारवाई केल्या जाईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून पोलिस महासंचकांकडून याचा आढावा ते दररोज घेत आहेत.स्फोटात जखमी झालेल्यांवर उपचार सरकार तर्फ करण्यात येत आहे.पहिले या स्फोटात एका व्यक्तिच्या मृत्यू तर ३० लोक जखमी झाल्याची नोंद होती.मात्र यात आता मृत्यू मुखी पाडणाऱ्यांच्या संखेत वाढ झाली आहे.आता यात मृत पावलेल्यांच्या संखेत दोनने वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण ३ जणांचा मृत्यू यात झाला आहे.या घटनेत १७ जण जळले आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.तर १२ जणांना आयसीयुत ठेवण्यात आले आहे.प्राथमीक तपासात हे कृत्य दहशत माजवण्याच्या दृष्टीने केल्याचे समोर आले आहे.टिफीनच्या डब्ब्यात ज्वलंशील वस्तूंचा स्फोट घडवण्यासाठी वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल अभ्यास सुरु असल्याचे आधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमामशी बोलताना सांगितले आहे. 

Latest Posts

Don't Miss