| TOR News Network |
P N Patil Latest News : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, पी. एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.(Kolhapur Congress Mla P N Patil No more) आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. (P N Patil Passed Away) वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.(Congress loyalist P N Patil)
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचे आज ( गुरूवार) पहाटे निधन झाले. (Kolhapur, Karvir vidhan sabha Mla P N PAtil ) ते 71 वर्षांचे होते. पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याच्या जवळचे म्हणूनही आमदार पी एन पाटील यांची ओळख होती. पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते. (P n Patil Close to vilasrao deshmukh) पाटील आणि विलासराव देशमुख यांचे घनिष्ट संबंध होते. विधानसभा निवडणुकीतील पी. एन. पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुखच करायचे.
पी एन पाटील हे रविवारी बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली.(P N Patil Slipped in bathroom) त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. (P N Patil Suffering From Injury) मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी. एन. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी येथे नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.
काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख
करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पी एन पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख होती. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग १८ वर्ष आमदार पाटील यांच्याकडे होतं.(P N Patil was District President of Congress from 18 years ) काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला उर्जित अवस्था दिली. पी एन पाटील हे गोकुळ दूध संघातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे कोल्हापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोण आहेत पी एन पाटील?
काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांची राज्यात ओळख आहे. गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत ते करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 वेळा आमदार झाले. (P N Patil two term congress mla) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.