Sunday, January 12, 2025

Latest Posts

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात

| TOR News Network |

Kanchanjunga Express Railway Accident Latest News :  पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. (West Bengal railway accident) कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. (Kanchanjunga Railway Accident) या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Five dead in railway accident) तसेच २५ प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कंचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे.(Rescue team on Accident Spot)

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. अपघातानंतर NDRF, SDRF टीम आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. (Wagon Train Accident in bengal)  एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

अपघातासंदर्भात कटिहार डीआरएमने सांगितले की, अपघाताच्या कारणांची तपासणी केली जात आहे. कटिहार आणि न्यू जलपाईगुडी (NJP) येथून बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. जखमींच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकेही रवाना आहेत.(Medical Team At Accident Spot) अपघातस्थळी पाऊस सुरु असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी अडथळे येत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.(Railway minister Order of inquiry)

Latest Posts

Don't Miss