Monday, November 18, 2024

Latest Posts

ज्योती मेटे बीडचे गणित बिघडवणार : निवडणूक लढवण्यास ठाम

| TOR News Network | Jyoti Mete Latest News  : बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (Jyoti mete to contest lok  sabha)शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर मेटे ह्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता आहे.त्यामुळे याचा थेट फटका कोणाला बसणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये ज्योती मेटे ह्या निवडणूक लढवतील,(Jyoti mete from beed lok sabha) असं बोललं जात होतं. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. ज्योती मेटे यांचं तिकीट निश्चित मानलं जात असताना काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. पक्ष सोनवणेंना तिकीट देणार की मेटेंना? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. (Bajrang sonawane ncp leader from beed)

दुसरीकडे ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी मानसिकता आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याबाबत मी अंतिम निर्णय घेणार आहे. शरद पवार गटाने आपल्याला का नाकारलं? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, याबाबतचा अंदाज मी वर्तवण्यापेक्षा त्याच पक्षाने याचा खुलासा करण्याची गरज आहे. मी मात्र लोकसभा निवडणूक लढवणार आहे. याबाबत बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बीडमध्ये परिस्थिती काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मराठा मतदार प्रभावित झालेला आहे. मराठा आरक्षणचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर दिसून येणार आहे.(Effect of Maratha Reservation on Lok Sabha Elections) भलेही जरांगेंकडून उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असलं तरी मतांवर परिणाम होणार आहे.

ज्योती मेटे ह्या मराठा आरक्षण लढ्याचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत. सुरुवातीपासूनच त्यांचं नाव मराठा उमेदवार म्हणून घेतलं जात होतं. परंतु मनोज जरांगेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मग शरद पवारांकडून मेटेंनी उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. शेवटी पवारांनी सोनवणेंना उमेदवारी दिली.

आता ज्योती मेटे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (Jyoti mete independent from beed) तसं झालं तर पंकजा मुंडेंना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही. बीडमध्ये कायम मराठा-वंजारा अशी मतांची विभागणी होते. मराठा मतं यावेळी मराठा उमेदवाराच्या मागे उभे राहतील, अशी शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss