Saturday, January 11, 2025

Latest Posts

अजित पवार गट हा पाकिटमारासारखा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्यानंतर शरद पवार गटाकडून सतंत्प प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्या विरोधात आक्रमकरित्या बोलत आहेत. निवडणूक आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” हे नाव शरद पवार गटाला देण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले. (Awhad welcome New NCP Name ) तसेच आता अजित पवार गटाला अलिबाबा चाळीस चोर, असे नाव देणार का? अशी टीका केली. (Jitendra Awhad Criticized Dhananjay)

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाने पाकिटमारासारखे शरद पवारांच्या मनगटावरचे घड्याळ चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. पण मनगट अजूनही शरद पवारांकडे आहे. ते मनगट चाळीशीत, साठीत जेवढे शक्तीशाली होते, तेवढेच आज ८४ व्या वर्षीही बळकट आहे. (Sharad Pawar Strong At 84) शरद पवार जेव्हा जेव्हा संघर्षाला उभे राहिले आहेत, तेव्हा त्यांनी इतिहास घडविला आहे. आताही पक्षाचे नाव, चिन्ह वेगळे असले तरी शरद पवार विजय खेचून आणतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मी जर काही चुकीचे केलं असतं तर

‘जितेंद्र आव्हाड पवारांच्या घरात आग लावत आहे’, असे विधान एका नेत्याने केले. यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, “मी आग लावण्याचे धंदे करत नाही. मी जर काही चुकीचे केलं असतं तर शरद पवारांनी माझा कान केव्हाच पकडला असता. उलट तुमच्या नादाला लागून पुतण्या (अजित पवार) खराब झाला. कारण तुमच्या रक्तातच ते होतं. जे माझ्या विरोधात बोलले, त्यांचे मी नावही घेणार नाही. तुम्ही तुमच्या बहिणीला, काकाला किती त्रास दिला. हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहीत नसेल पण परळीतल्या गावागावात माहीत आहे.

काय म्हणाले होते मुंडे

अजित पवार यांच्या बारामतीमधील भाषणानंतर ते शरद पवार यांच्या मरणाची वाट पाहत आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, अजित पवार कोणाच्याही मरणाचा कधीच विचार करणार नाहीत. अजित पवार जे बोलले त्याचा विपर्यास करून जितेंद्र आव्हाड सहानुभूती मिळवत आहेत. उलट आव्हाडच असा हीन विचार करत आहेत. त्यांना शरद पवार यांच्यानंतर पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. त्यामुळ त्यांनी पवार कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती.

Latest Posts

Don't Miss