Saturday, January 11, 2025

Latest Posts

जरांगे यांच्यावर मध्यरात्री तातडीने उपचार सुरु

Manoj Jarange Patil मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा प्रकृती बिघडली आहे .त्यांच्या छातीत कळा आल्याने त्यांच्यावर आंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले.पण छातीत त्रास वाढल्याने  छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत बोलवण्यात आले.रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. (Manoj Jarange Patils Healdh Goes Down)

शुक्रवार मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी अंतरवाली सराटी येथे आले होते ,या ठिकाणी दिवसभर त्यांनी नागरीकाबरोबर संवाद साधला , रात्री त्यांना छातीत दुखु लागले ,अशक्तपणा जाणवला होता वडीगोद्री येथील खाजगी डॉक्टर राजेंद्र तारख यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्या नंतर मध्यरात्री छत्रपती येथील खाजगी डॉक्टर चावरे , डॉक्टर रमेश तारख यांनी व पथकांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांची तपासणी केली. जरांगे यांची तब्येत सध्या चांगली असून ते अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी आहेत.

त्रास अधिक वाढल्याने ….

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना शुक्रवारी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. दरम्यान, डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीला पोहचले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने आणि त्रास अधिक वाढल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संभाजीनगरच्या डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. (Doctor Staff called Urgently For Jarange Patil)

रात्री दीड वाजता इसीजी काढण्यात आला

त्यामुळे संभाजीनगरच्या डॉक्टरांचं पथक आंतरवालीत पोहचलं आणि जरांगे यांची तपासणी करण्यात आली. रात्री दहा वाजता पहिला इसीजी काढण्यात आला, त्यामध्ये कोणताही धोका नसल्याचे समोर आलं. त्यानंतर देखील डॉक्टरांचं पथक तिथेच थांबून होतं. रात्री दीड वाजता पुन्हा दुसरा इसीजी काढण्यात आला आणि त्यात देखील कोणताही धोका नसल्याचे समोर आले.(ECG Of Jarange Patil) आता जरांगे यांची तब्येत स्थिर आहे.

at midnight jarange patils health goes down

Latest Posts

Don't Miss