Thursday, January 16, 2025

Latest Posts

इतकं नीच सरकार कधी पाहिलं नाही – जरांगे पाटील

| TOR News Network |

Manoj Jarange Latest News : राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील दौरे करत असून मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. ते अनेक ठिकाणी सभा देखाल घेत आहेत. (Jarange Patil public rally) काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृतीत सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली.यावेळी त्यांनी माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय, (They are trying to attack on my family) असा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

जरांगे पाटील म्हणाले , माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय. इतकं नीच सरकार कधी पाहिलं नाही.(Jarange patil on government) मी डावाला लागलो, आता माझं कुटुंब लागलं. माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही. मी माझ्या बापाला आणि बायकोला अगोदरच सांगितलंय की डोळ्यात पाणी आणू नका. मी गेलो तरी माझ्या बापाला तीन मुलं आहेत. माझं रक्षण करायला माझा समाज आहे. काही झालं तरी शांत राहा. उपोषणामुळं शरीर साथ देत नाही म्हणून तुम्हा सर्वांना जबाबदारी देतो.(Jarange patil on Family) मी तुमच्यात असो किंवा नसो तरी समाज फुटू देऊ नका. तसंच राजकीय लोकांसाठी फुटू नका. आमरण उपोषण होणारच, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

 ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत जरांगे म्हणाले की, आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. इतके दिवस इतरांनी खाल्लं आता आम्हाला द्या. तो एक नेता म्हणतो, आता आरक्षणाची एसटी फुल झाली. एसटी फुल असेल तर दार उघडून दाखवा. जर नाही दाखवलं तर ओबीसीमधूनच आरक्षण घेऊ. कारण ती बस आतमधून रिकामीच आहे, (Manoj jarange patil on chaggan bhujbal) अशी टीका जरांगे यांनी केली.

मी यांच्याकडून मॅनेज होत नाही. (i will never manage) ना पैशांनी, ना पदानं, म्हणून माझ्यावर सरकारला कारवाई करायची आहे. माझ्यावर चौकशी समिती नेमली गेली. पण मला तडीपार केलं तर दुसऱ्या राज्यातील मराठे एकत्र करून आंदोलन करतील. जेलमध्ये टाकलं तर कैदी एकत्र करून आतमध्ये मोर्चा काढेल, पण मी थांबणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.(Jarange patil warning to govt)

मी मराठा समाजसह इतर समाजाचं भांडण कमी केलं तरी मला जातीवादी म्हणलं जातंय. यांचे लेकरं विदेशात जाऊन मोठे होतात आणि आपले पोरं शेतात जातात. लेकरांवर होणारा अन्याय लक्षात ठेवा. नेत्यांनी जातीच्या विरोधात जाऊ नय. निवडणूक येईल जाईल. मात्र त्यांनी समाजाच्या सोबत रहावं. 4 जून रोजी अंतरवली येथे पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं. (Jarange Patil on protest from 4th june)

Latest Posts

Don't Miss