Saturday, January 18, 2025

Latest Posts

जरांगे पाटलांचा 30 ते 40 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार

| TOR News Network |

Jarange Patil Latest News : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटल यांनी आपलं 5 दिवसांचं उपोषण स्थगित केलं आहे. आता त्यांनी राजकीय मैदानात उतरण्याची घोषणा केलीय. (Jarange Patil On Vidhan sabha 2024)अंतरवालीतून जरांगे पाटलांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय. विधानसभेत (Maharashtra Assembly Election 2024) 30 ते 40 आमदार पाठवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.(Jarange Patil’s 30 to 40 leaders to contest vidhansabha election) विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपला मराठा आंदोलनाचा चांगलाच फटका बसल्याचं दिसून आलं आहे.(Jarange Factor works in loksabha)

जरांगे पाटील यांचा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केलाय.  40 आमदार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केलाय. (Jarange Patil Determination to win 40 seats in vidhansabha) विधानसभेला जरांगे किती उमेदवार देणार? जरांगे पाटील यांनी कोणत्या मतदारसंघांची चाचपणी केलीय? लोकसभेला मराठवाड्यात चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला राज्यभरात चालेल का? जरांगेंच्या मिशन विधानसभेचा फटका कुणाला बसेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतायत मिशन विधानसभेची घोषणा करताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Jarange PAtil On Devendra Fadanvis) पुन्हा एकदा तिखट शब्दात निशाणा साधला. तर भाजपनंही जरांगेंवर जोरदार पलटवार केला.

देवेंद्र फडणवीस कायमचे राजकारणातून संपले पाहिजेत अशी भावना, मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली. त्यावर प्रत्युत्तर देताना, फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? असा सवाल प्रसाद लाड यांनी केलाय.(Prasad Lad On Jarange patil)तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय.

मनोज जरांगेंनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवरही निशाणा साधलाय. 5 ते 7 जणं भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा त्यांनी दिलाय.

Latest Posts

Don't Miss